ऑर्केस्ट्रा -
एक नवीन
 
युगाची सुरुवात

फायदेशीर कीटकांसाठी उत्कृष्ट सुरक्षिततेसह प्रभावी भात बीपीएच व्यवस्थापनासाठी नवीन जपानी तंत्रज्ञान!

पुढे वाचा

सर्व काही ठिक होईल   

भात कृषी पर्यावरण प्रणालीचे संरक्षण

शेतकरी मित्रांनो आपणास आपल्या धान पिकाचे भुरा मावा ( बीपीएच) च्या नुकसानीपासून संरक्षण करणे आपल्या पिकाच्या नफ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. सध्या आपण बीपीएच चे  नियंत्रण करण्यासाठी अति विषारी   रासायनिक द्रावण वापरत आहोत ज्यामुळे आपल्या धान पिकातील पर्यावरणाची जीवन साखळी ला  हानी पोहोचत आहे  . या अति विषारी व हानिकारक  उत्पादनांमुळे  कोळी, लेडीबर्ड बीटल, मधमाश्या, मिरीड बग आणि डॅमसेफ्लाय यांसारख्या फायदेशीर कीटकांची संख्या कमी होऊ शकते.   आज, मधमाशांच्या संख्येमध्ये झपाट्याने होणारी घट हा मानवतेला आणि पर्यावरणासाठी सर्वात मोठा धोका आहे. सध्या स्थितीमध्ये  आपल्या गुरांना रासायनिक प्रक्रिया केलेला चारा दिला जातो. याचा पशुधनाच्या आरोग्यावर आणि आपल्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. आपली कुटुंबे सतत किंवा अप्रत्यक्षपणे या विषारी वातावरणाच्या संपर्कात असतात.   पण दुसरीकडे, बीपीएच ही हानिकारक कीड  अधिक प्रबळ  होत आहे, ही कीड विविध रसायनांच्या प्रति प्रतिकार विकसित करत आहे आणि या  रसायनांस  कमी प्रभावी बनवत आहेत . हे असे का होत आहे ? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर ही समस्या आपल्या विचारांपेक्षा देखील अधिक मोठी आहे. रसायनांशिवाय बीपीएच नियंत्रित करणे कठीण आहे. पण तंत्रज्ञान हे जादूसारखे असले पाहिजे, तसेच ते  तंत्रज्ञान  कोणत्याही दुष्परिणामांशिवाय उपयोगात येणे  आवश्यक आहे.  

अचूक तंत्रज्ञानाची गरज

निचिनोचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या समस्या अचूकपणे सोडविते ,तसेच पर्यावरण व फायदेशीर कीटक यांना हानी न पोहोचवता बीपीएच नियंत्रण करते . ज्यामुळे धानशेतीच्या जैविक साखळी चे संरक्षण होते .निचिनोचे तंत्रज्ञान तुमचे, तुमच्या कुटुंबाचे आरोग्य आणि नैसर्गिक संसाधनांचे नुकसान होण्यापासून वाचवते.  

बीपीएच ​नियंत्रण आणि सुरक्षिततेचे नवीन युग

नवीन जपानी तंत्रज्ञान

अत्यंत प्रभावी आणि नियंत्रणाचा दीर्घ कालावधी

निरोगी फुटवे, एकसमान भरलेले लोंब  आणि चांगले उत्पन्न

नैसर्गिक शत्रूंसाठी अत्यंत सुरक्षित

BPX द्वारे समर्थित

"ऑर्केस्ट्रा"  हे  "बी पी एक्स" (BPX) या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे विकसित आहे." बेंझपायरिमोक्सान "-बीपीएक्स (Benzpyrimoxan - BPX ) हे कीटकनाशकांच्या श्रेणीतील नवीन IRAC वर्गाशी संबंधित आहे.बीपीएक्स (BPX) हे तंत्रज्ञान जपान मधील अग्रगण्य तसेच नवनवीन तंत्रज्ञान संशोधित करणारी  आमची मूळ कंपनी  " निहोन नोह्याकू कॉर्पोरेशन "  यांनी विकसित केली आहे.

"ऑर्केस्ट्रा" (Orchestra®)  हे उत्पादन हॉपर मधील  इडीजोन (ecdysone) च्या चयापचयावर परिणाम करतो आणि  इडी जोन टिटर (ecdysone titer ) कमी होण्यास विलंब होतो. परिणामी, इडीसिस (ecdysis) ची यंत्रणा विस्कळीत होते, व असामान्य इडीसिस (ecdysis ) मुळे हॉपरचा मृत्यू होतो

प्रभावी आणि दीर्घ कालावधीचे बीपीएच नियंत्रण 14-21 दिवसांपर्यंत

ऑर्केस्ट्रा उपचारीत

न वापरलेल्या ठिकानि ब्राउन प्लांट हॉपर (BPH) ची संख्या 95% कमी होते.
प्रस्तापित मानांकन पेक्षा (मार्केट स्टँडर्डपेक्षा)  20% कमी ब्राउन प्लांट हॉपर (BPH).   

"ऑर्केस्ट्रा" हे उत्पादन बेंझपायरिमॉक्सन [BPX] द्वारे समर्थित आहे ,  आणि  ते ज्या भुरा मावा(BPH ) आणि व्हाईट बॅक प्लांट हॉपर (WBPH) ने  विद्यमान उत्पादनांविरूद्ध प्रतिकार विकसित केला आहे त्यावर सुद्धा  अत्यंत प्रभावी आहे.   

यु टी सी

विनाशकारी BPH हल्ला

आमच्या अंतर्गत चाचण्यांवर आधारित डेटा

14-21 दिवस नियंत्रण

शिफारशींनुसार ऑर्केस्ट्राचा वापर केल्यावर, तुम्ही फवारणीनंतर 14-21 दिवसांपर्यंत बीपीएच पासून पीक नियंत्रित  ठेवू शकता. दीर्घ कालावधीचे नियंत्रण असल्या कारणाने आपल्या दोन फवारणी मधील अंतर वाढते  व त्यामुळे फवारणी ची संख्या  प्रभावीपणे  कमी होते. बीपीएच नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या फवारण्या कमी झाल्यामुळे  शेतकऱ्याच्या श्रमाची, वेळेची आणि पैशाची बचत होते.  

तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे हे आम्हाला माहीत आहे

ऑर्केस्ट्रा कसे वापरावे:
3Rs चे अनुसरण करा

योग्य अवस्था
आठ (8) पेक्षा कमी हॉपर प्रति झाड (<8 bph/hill) किंवा कमाल फुटव्यांची  स्टेज

  • हे पूर्णपणे प्रतिबंधात्मक उपचारासाठी चे  उत्पादन आहे. 
  • त्यामुळे प्रादुर्भावाची पातळी ८ हॉपर्स/ प्रती झाड व त्यापेक्षा  ते कमी असतानाच वापरावे.
  • जास्त फुटवे सुरू झाल्यापासून त्या क्षेत्राचे निरीक्षण करत रहवे.  

योग्य डो​स   
400 मिली/एकर   

  • 400 मिली प्रति एकर योग्य डोस आहे. 
  • आधी स्टॉक सोल्यूशन तयार करा जेणेकरून सक्रिय घटक ( a.i )सर्व फवारणी च्या टाक्यांमध्ये समान रीतीने वितरित होईल 

योग्य पद्धत
200 लिटर पाणी

  • फवारणी साठी 200 लिटर पाणी प्रति एकर वापरने हे योग्य आहे .  
  • सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी 200 लीटर पाण्याचे प्रमाण आवश्यक आहे.  एकसमान आणि संपूर्ण कव्हरेज होण्याकररिता पाण्याचे योग्य प्रमाण वापरा.
  • नोझल पिकाच्या तळाशी टार्गेट करा

शिफारशी

ऑर्केस्ट्राद्वारे सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी, फवारणी बीपीएच लोकसंख्या नुकतीच सुरू झाली असताना किंवा ​​आठ (८ ) पेक्षा कमी हॉपर प्रति झाडवर केली पाहिजे जी लागवडीनंतर सुमारे 45 ते 50 दिवसांची शक्यता आहे.
जेव्हा संख्या 8 BPH/​प्रति झाडच्या पुढे वाढते तेव्हा ​​गोहान सह दुसरी फवारणी करा.

तज्ञ आणि वापरकर्ता शेतकरी ऐका